हे पुस्तक आदिवासी, दलित आणि कृष्णवर्णीय अशा तीन घटकांविषयी बोलते आहे. या पुस्तकाला वैश्विक परिमाण आहे, आणि ते ‘भुके’चे आहे…
या पुस्तकात खूप कथा आहेत. लबाड व लाचखोर तलाठ्याकडून ‘उलट्या पिसाची कोंबडी’ वसूल करणाऱ्या चिमाची गोष्ट इथे आहे. ‘दुसरीकडे काम शोधतो’ म्हणून संतापून मालकाने ज्याचा जीव घेतला त्या झिपरू मुकणेची गोष्ट इथे वाचायला मिळेल. गावाने सक्तीने म्हारकी करायला लावलेला बी.ए. पास गोरख इथे तुम्हाला भेटेल. ‘काळ्या रंगाला बदनाम करू नका’ म्हणून ठणकावून सांगणारा अमेरिकेतील कृष्णवर्णीय तरुण कमाऊ मचेरिया इथे तुमच्याशी गप्पा मारेल.......